लॉकडाऊन मध्ये घरी बसून लाखो रुपये मिळवण्याच्या ५ ऑनलाईन पध्दती

काय खरंच हे शक्य आहे? हो आपण ऑनलाईन खूप सारे पैसे कमाऊ शकतो. फक्त आपली मेहनत करण्याची तयारी आणि आपल्या कामामध्ये सातत्य पाहिजे. भारतातले खूप सारे लोक ऑनलाईन पैसे कमवतात पण त्यामध्ये मराठी लोक खूप कमी आहेत. त्याची काय कारणे असतील ते आपण कंमेंट मध्ये सांगू शकता.
      आपण पाहू शकतो कि लॉकडाऊन मध्ये सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे पण ऑनलाईन गोष्टींवर नाही, उलट जास्त लोक  नेट चा वापर करू लागले आहेत त्यामुळे ऑनलाईन कामे करणाऱ्यांचा इनकम वाढला आहे. खाली दिलेल्या ५ ऑनलाईन कामांपैकी आपल्या आवडीनुसार एक जरी निवडले  तरी आपण आपली कमाई चालू करू शकता, फक्त एक लक्षात ठेवा कि तुम्हाला लगेच लाखो रुपये मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे काम करावे लागेल.१. Drop-shipping/Reselling :- यामध्ये आपल्याला कोणतेही प्रॉडक्ट विकत न घेता Wholesaler किंवा Distributor कडून डायरेक्ट प्रॉडक्ट कस्टमर कडे आपल्या नावाने पोहोचते आणि आपल्याला घरी बसून कमिशन अकाउंट वर मिळते. यामध्ये आपल्याला फक्त प्रॉडक्ट ची सोसिअल मीडिया वर मार्केटिंग करून ऑर्डर घ्यायच्या आहेत. डिलिव्हरी, पेमेंट जमा करणे हि सर्व कामे कंपनी करते. यामध्ये meesho, Shop101 सारखे अँप्स आहेत. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अँप डाउनलोड करा आणि RANJEET812 या कोड चा वापर करा आणि आजच drop-shipping चालू करा. Download Meesho Now - https://meesho.com/invite/RANJEET812  


२. Blogging/Content Writing:- यामध्ये आपण आपल्या आवडीच्या विषयावर किंवा एखाद्या organisation साठी part time  किंवा full time लिखाण करून पैसे मिळवू शकता. आजकाल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डिजिटली लोक जास्त कन्टेन्ट वाचतात. आपल्या ब्लॉग ला ट्राफिक वाढलं कि ऍडसेन्स द्वारे तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. 

३. YouTube:- आपल्या देशामध्ये ३० कोटीच्या वर लोक दररोज विडिओ पाहत असतात. आपल्यामध्ये जे कौशल्य आहे ते कमी वेळात जास्तीत जास्त लोकांसमोर मांडण्याचा सोपा पर्याय. लोकांच्या गरजेचा  असणारा कोणताही विषय घेऊन आपण विडिओ बनवू शकता. जेव्हा तुमचे १००० subscribers आणि ४००० तासांचा watch time पूर्ण होईल तेव्हा तुमचा इनकम चालू होईल. तुम्ही लाखोंमध्ये कमवू शकता. 

४. Freelancing:- यामध्ये आपण आपल्यामध्ये जे कौशल्य आहेत त्याची माहिती फ्रीलान्सर site वर अपलोड करू शकता. तुमच्या प्रोफाइल नुसार companies/advertisers /publishers / writers गरजेनुसार तुम्हाला part time  किंवा full time जॉब्स च्या ऑफर करतात. freelancer.in, Upwork, Fiverr यांसारख्या site आहेत. 

५. Affiliate Marketing:-  यामध्ये अमेझॉन , फ्लिपकार्ट  सारख्या कंपन्यांसाठी काम करून म्हणजेच आपण जेव्हा Affiliate मार्केटिंग प्रोग्रॅम जॉईन करतो आणि प्रॉडक्ट च्या लिंक share करतो, तेव्हा त्या लिंक वर जाऊन आपले मित्र, नातेवाईक ती वस्तू खरेदी करतात तेव्हा आपल्याला कंपनी कडून कामिशीन मिळते. १ ते १० % पर्यंत कमीशन असते.   

अधिक माहितीसाठी आपण इंटरनेट चा वापर करू शकता. डिजिटल मार्केटिंग चा अभ्यास करून आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. आपल्याला आमच्याकडून खुप खूप शुभेच्या. 

धन्यवाद.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या