Apply For Caste Certificate Sitting at Home। घरी बसून काढा आता जात प्रमाणपत्र.

जातीचा दाखला हा व्यक्तीच्या जातीच्या ओळखीचे प्रमाणपत्र असते जे आपल्याला शैक्षणिक किंवा नौकरीच्या ठिकाणी कामी येते. भारत सरकारने किंवा राज्य सरकारने बनवलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे. मराठा जातीचा दाखला कसा काढायचा हे पाहायचे असेल तर मराठा या लिंक वर क्लिक करा. भारतीय संविधानानुसार वेगवेगळ्या जातींना आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावरून आरक्षण दिले आहे. या आरक्षणाचा प्रत्यक्षामध्ये उपयोग होण्यासाठी जातीचा पुरावा लागतो.आपल्या जातीनुसार पुरावे गोळा करून जातीचा दाखला काढावा लागतो. त्यासाठी सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. त्यासाठी वीवीथ जातीनिसार कोणत्या वर्षांपूर्वीचा पुरावा पाहिजे हे खाली नमूद केले आहे.

१. अनुसूचित जाती व जमाती (ST): अर्जदाराकडे ६ सप्टेंबर १९५० पूर्वीचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा असावा.

२. अनुसूचित जाती व जमाती (SC): अर्जदाराकडे १० ऑगस्ट १९५० पूर्वीचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा असावा.

३. विमुक्त जाती/ भटक्या जाती जमाती (NT/VJNY): अर्जदाराकडे २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा असावा.     

४. इतर मागास वर्ग (OBC): अर्जदाराकडे १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा असावा.

५. विशेष मागास वर्ग (SBC): अर्जदाराकडे  १९६१ पूर्वीचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा असावा.

६. मराठा (SEBC): अर्जदाराकडे  १९६७ पूर्वीचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा असावा.

वरील प्रमाणे आपल्या जातीनुसार पुरावा उपलब्ध असल्यास वंशावळी नुसार सर्व कागदपत्रे जोडावेत. वंशावळी मध्ये आजोबा, वडील, काका, चुलत काका, भाऊ, चुलत आजोबा अश्या लोकांचा समावेश होऊ शकतो, लग्न झालेली महिला असेल तर माहेरची कागदपत्रे जोडावी लागतात. आपण आपले जात प्रमाणपत्र ऑफलाईन किंवा ऑनलाईन अश्या दोन्ही पद्धतीने काढू शकतो.

आपले सरकार या पोर्टल वर जाऊन जातीचा दाखला काढण्याची प्रोसेस खालीलप्रमाणे.

१. आपले सरकार वर जाऊन user id , Password आणि captcha टाकून लॉगिन करा. त्यासाठी अगोदर पोर्टल ला रजिस्टर करावे लागेल NonCremeLayer  या पोस्ट वर जाऊन रजिस्टर कसे करावे आणि नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट कसे काढावे याची पूर्ण माहिती घ्या.

२. लॉगिन झाल्यानंतर डाव्या साईड ला महसूल विभाग (Revenue Department) वर क्लिक करा.

३. कास्ट सर्टिफिकेट वर टिक करून processed करा.

४. कास्ट सर्टिफिकेट वर क्लिक केल्यावर पूर्ण Document  लिस्ट दिसेल, गरजेची सर्व कागदपत्रे आपल्या फोन मध्ये किंवा कॉम्पुटर मध्ये स्कॅन करून ठेवा.

५. यामध्ये तुम्हाला Proof of Identity (Any १), Proof Of Address (Any १), Other Documents (Any १) दिलेल्या लिस्ट मधील कोणताही एक पुरावा असणे आवश्यक आहे.  यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, पण कार्ड, रेशन कार्ड आणि लाईट बील असे पर्याय आहेत.

६. ४५ दिवसांचा वेळ दिलेला आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला जातीचा दाखला मिळेल, आपलं अप्लिकेश Sub Divisional Officer कडे जाईल.    

७. लिस्ट मध्ये दिलेल्या कास्ट पैकी आपली कास्ट निवडा. सर्व जातींचे फॉर्म हे जवळजवळ सारखेच असतील.

८. लाभार्थी जर १८ वर्ष वयाचा नसेल तर सज्ञान व्यक्तीच्या नावे अर्ज करावा लागेल.

९. फॉर्म ओपन झाल्यानंतर नाव, वडिलांचे नाव, DOB, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार नंबर, ऍड्रेस, अशी पूर्ण माहिती भरा.

१०. लाभार्थी आणि अर्जदार यांचे नातेसंबध टाका, स्वतः अर्ज भरत असाल तर सेल्फ निवडा.

११. Beneficiary details मध्ये लाभार्थ्यांची पूर्ण माहिती भरा.

१२. वडिलांची पूर्ण माहिती, व्यवसायाची माहिती, कास्ट डिटेल्स भरून घ्या.

१३. तुम्ही जे दस्तऐवज जोडणार आहेत ते yes म्हणून टिक करा.

१४. मला मंजुर आहे वर क्लिक करून save करा.

१५. * (स्टार) असणाऱ्या सर्व गोष्टी भरणं गरजेचं आहे. सेव केल्यानंतर कागदपत्रे अपलोड  करण्याचे पेज ओपन होईल.

१६. गरजेच्या साईझ नुसार म्हणजेच ७५kb ते १००kb  मध्ये कागदपत्र अपलोड करावी.

१७. कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर पेमेंट करावे, यशस्वीरीत्या पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म महसूल विभागाकडे जमा होईल.


  फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट नंबर मिळेल, लॉगिन करून आपण स्टेटस चेक करू शकता. ४५ दिवस झाले आणि तरीही आपलं अप्लिकेशन प्रोसेस मध्ये दाखवत असेल तर आपण additional Collector किंवा कलेक्टर कडे अपील करू शकतो. फॉर्म भरताना सर्व माहिती व्यवस्थित भरा. काही अडचण आली तर कॉन्टॅक्ट फॉर्म भरून आम्हाला सांगू शकता.


धन्यवाद.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या