How to Apply For Non Creamy Layer Certificate at Home? घरी बसून नॉन क्रिमी लेअर कसे काढाल?

Non Creamy Layer Online 


बऱ्याच लोकांचा Non Creamy Layer आणि Non Criminal मध्ये गोंधळ होत असतो. Non Criminal हे गुन्ह्याशी निगडित आहे तर Non Creamy Layer हे शिक्षणामध्ये आरक्षणाची सवलत घेण्यासाठी उपयोगी ठरते. हा एक उत्पन्नाच्या दाखल्याशी निगडित आहे जो शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतेवेळी जमा करावा लागतो. आपण हा दाखल online किंवा Offline अश्या दोन्ही पद्धतीने काढू शकतो. परंतु सध्या लॉकडाऊन मुळे मुलांना Offline काढण्यामध्ये अडचणी येत आहेत म्हणून महाराष्ट्र सरकारने आपले सरकार पोर्टल वर याची सोय केली आहे. इतर सर्व दाखल्यांबद्दल माहिती हवी असलं तर https://www.babaranjit.in/2020/07/blog-post_21.html वर जाऊन पाहू शकता. 
आज आपण online पद्धतीने दाखला कसा काढायचा याची पूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत.
आपले सरकार वर जाऊन (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) अगोदर रजिस्टर करून घ्यावे लागेल. त्यासाठी 

१. New User/Register Here वर क्लिक करा. 
२. Select Option १
३. आपला जिल्हा निवडा 
४. १० डिजिट मोबाईल  नंबर टाकुन OTP सेंड करा. 
५. User Name टाका.  उदा. RajPatilCert  
६. Available असेल तर पासवर्ड टाका.  उदा. Patil@१२३ (यामध्ये Number, Character आणि Symbol यायला हवेत)
७. आपलं पूर्ण नाव आणि जन्मतारीख टाका. 
८. I Accept वर क्लिक करून रजिस्टर करा. 

रजिस्टर केल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबर वर user id येईल. User Id, Password आणि Captcha code टाकून लॉगिन करा. यशस्वीरीत्या लॉगिन झाल्यानंतर होम पेज वर डाव्या बाजुला  सर्व प्रकारची डिपार्टमेंट ची लिस्ट दिलेली असेल त्यामध्ये Revenue डिपार्टमेंट निवडा. Revenue Services मध्ये नॉन क्रिमी लेअर निवडून Processed  करा. 
आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची लिस्ट तुम्हाला दिसेल. आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून आपल्या लॅपटॉप, कॉम्पुटर किंवा मोबाइल मध्ये ज्याच्यावरून आपण प्रोसेस करणार आहेत त्यामध्ये save करून ठेवा. 

१. Proof Of Identity (Any १): दिलेल्या सर्व पर्यायायांपैकी आपल्याकडे एक ओळखपत्र असणं गरजेचं आहे. यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायविंग लायसन्स यांचा समावेश आहे. 


२. Proof of Address (Any १): दिलेल्या पर्यायांपैकी आपल्या ऍड्रेस च्या पुराव्यासाठी एक ओळखपत्र असणे गरजेचे आहे. यामध्ये आधार कार्ड, लाईट बिल, मतदान कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारख्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र लागेल. 


३. Other Documents: यामध्ये Property Tax, Proof of Cast of Relative यांसारखी कागदपत्रे लागतात. 


४. Mandatory Documents: ही सर्व कागदपत्र तुम्हाला गरजेची आहेत यामध्ये १. Income Proof  २. Proof of Cast for Self  ३. Affidavit of Cast अश्या प्रकारचे पुरावे द्यावे लागतील. 


यानंतर application Form  भरायचा आहे यामध्ये Cast Certificate मध्ये Non creamy  Layer निवडून खाली दिलेली माहिती भरायची आहे. 

१. पूर्ण नाव 
२. वडिलांचे पूर्ण नाव
३. जन्मतारीख 
४. मोबाइल नंबर 
५. ई-मेल आयडी 
६. आधार नंबर 
७. Nationality 
८. पूर्ण पत्ता 
९. Relation Of Beneficiary With Applicant (स्वतःसाठी काढत असाल तर self  निवडा)
१०. Current Address आणि Permanent Address  सारखा असेल तर yes वर टिक करा. नसेल तर सध्याचा पत्ता टाका. 
११. याच्या अगोदर सर्टिफिकेट काढलं असलं तर त्याची माहिती भरा. 
१२. वडिलांची किंवा मुलीचं लग्न झालं असेल तर मिस्टरांची \माहिती भरा. 
१३. ३ वर्षाची उत्पन्नाची माहिती द्या. 
१४. Family Income बद्दल पूर्ण माहिती द्या. 

सर्व कागदपत्रे योग्य असतील तर Do You Need Affidavit ला No करा. 

सर्व आवश्यक कागदपत्रे Upload करा. पासपोर्ट साईझ फोटो आणि सही असेल तर ५kb  ते २०kb मध्ये असावी आणि इतर कागदपत्रे ७५kb  ते १००kb  पर्यंत असावीत. साईझ कमी-जास्त करायची असेल तर http://jpeg-optimizer.com/ इथे जाऊन तुम्ही करू शकता. Submit करा आणि Payment करा. 

सर्टिफिकेट साठी २१ दिवसांची मुदत असेल जर तुम्हाला दिलेल्या मुदतीमध्ये नाही मिळालं तर तुम्ही अपील करू शकता. 

धन्यवाद.    
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या