सर्वात जास्त पगार मिळणाऱ्या १० सरकारी नौकऱ्या (Top 10 highly paid Government jobs in India)

भारतामध्ये खाजगी नौकरीपेक्षा सरकारी नौकरी असणाऱ्या व्यक्तीला जास्त महत्व दिल जातं. कोणी सरकारी कार्यालयांमध्ये शिपायाची नौकरी करत असेल तर त्याला उच्च पदावरील खाजगी नौकरीपेक्षा श्रेष्ठचं  समजलं जातं. सरकारी नौकरी मिळाली कि पद, प्रतिष्ठा आपोआप वाढते. लाखो मुले सरकारी नौकरी मिळवण्यासाठी दिवस-रात्र अभ्यास करतं असतात. सरकारी नौकरीमध्ये सॅलरी बरोबरच इतर गोष्टींचा लाभ मिळतो. काही नौकऱ्या मिळवणं खूप अवघड काम असतं म्हणजे जागा कमी असतात आणि फॉर्म लाखोने येतात. सरकारी नौकरी मध्ये स्पर्धा खूप वाढली आहे. आजकाल पालक आपल्या पाल्याना  अगदी सुरुवातीपासून तयारीला लावतात.  जास्त पगार असणाऱ्या नौकऱ्या खालील प्रमाणे.


१. IAS (Indian Administrative Service): हि एक सर्वात महत्वाची सिविल सर्विस मानली जाते. केंद्र सरकारच्या अंडर आणि राज्य सरकारच्या क्षेत्रामध्ये IAS आपली कामे पाहतात. UPSC (Union Public Service Commission)  मार्फत याची परीक्षा घेतली जाते. खूप सारी महत्वाची कामे यांना करावी लागतात जसं की  सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे, कायदा आणि सुव्यवस्था पाहणे, लोकांच्या विकासासाठी नवीन सुविधा राबवणे तसेच लोकांचे प्रश्न सोडवणे. देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक मानली जाते. District Collector, Head of Any Department/PSU  अश्या प्रकारच्या पदांवर यांची नियुक्ती होते. याना ग्रेड नुसार पगार मिळतो तसेच इतर भत्ताही मिळतो. त्याबाबरोबरच सर्व प्रकारच्या सुविधा मोफत मिळतात. ५० हजार ते २ लाख महिना सॅलरी मिळते. 


२. IPS (Indian Police Service): यांचीही UPSC (Union Public Service Commission) मार्फत निवड केली जाते. IPS वरती Ministry of Home Affairs चं कंट्रोल असतं . कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे यांचं मुख्य काम असतं . संकटाच्या काळात योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळणे यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं. गुन्हे रोखणे, रस्ते अपघात, मतदान डयुटी , जिल्ह्यामध्ये शांती राखणं , VIP लोकांसाठी सुरक्षा पुरवणं अशी कामे करावी लागतात. DSP ते ADG अश्या प्रकारे बढती होत जाते त्यामुळे सॅलरी बढतीनुसार वाढत जाते. 


३. IFS (Indian Foreign Service): हि सरकारी नौकरी UPSC मार्फतच घेतली जाते. IFS झाल्यानंतर देश-विदेशामध्ये सर्विस करावी लागते.एक फॉरेन ची भाषा अवगत असणं गरजेचं असतं. IAS /IPS प्रमाणेच डिग्री च्या शेवटच्या वर्षाला असताना किंवा डिग्री झाल्यानंतर फेब्रुवारी च्या आसपास फॉर्म भरावा लागतो. जनरल साठी २१ ते ३२ वर्ष, OBC साठी २१ तो ३५ आणि SC /ST  साठी २१ ते ३७ अशी  वयोमर्यादा आहे. ६० हजार ते २.५ लाखांपर्यंत सॅलरी मिळते व इतर भत्ता वेगळा मिळतो. 


४. Defense Services: डिफेन्स सर्विस मध्ये Army, Navy आणि Air-force चा समावेश होतो. देशाचं संरक्षण करणं यांच्या हाती असतं  म्हणून डिफेन्स सर्विस मध्ये जाणं गर्वाचं, अभिमानाचे समजले जाते. NDA (National Defense Academy) आणि CDS (Combine Defense Services) द्वारे आपण डिफेन्स मध्ये प्रवेश करू शकतो. NDA  मध्ये १२वी पास झालेली किंवा १२ मध्ये असणारी मुले फॉर्म भरू शकतात. पुण्यामध्ये याचं प्रशिक्षण दिलं जातं . १६. ५ ते १९. ५ वयाची अट आहे. CDS  मधून प्रवेश घेण्यासाठी B.Tech सारखी पदवी असणं गरजेचं आहे. जगामध्ये भारताची ३ नुंबरची आर्मी आहे. आर्मी साठी कोणत्याही शाखेची पदवी चालते. डिफेन्स सर्विस मध्ये खूप चांगली सॅलरी आणि इतर भत्ता हि मिळतो.


५. Banking: बँकिंग मध्ये PO (Probationary Officer), RBI Assistant, RBI Grade B, RBI गव्हर्नर अश्या प्रकारची उच्च पदे असतात.  PO ला १८ लाखांच्या आसपास वार्षिक वेतन मिळते. RBI Assistant ला सुरुवातीला दररोजची ऑपेरेशनल कामे पाहावी लागतात. त्यांना सुरुवातीला ३५ हजार आणि इतर भत्ता मिळतो. RBI Grade B ऑफिसर ला ७६ हजार आणि इतर भत्ता मिळतो. या पदासाठी ६०% ने पदवी घेतलेली हवी.६. Scientist: रिसर्च करण्यासाठी यांचा खूप मोठा हात असतो. देशाच्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी नवनवीन शोध लावले जातात.  ISRO (Indian Space Research Organisation ) DRDO (Defense Research and Development Organisation) या दोन संस्था प्रामुख्याने काम पाहतात. यासाठी १२th + Graduate +Post Graduate with Core Subject  +  PHD असं शिक्षण घ्यावं लागतं. ISRO  ची १९६९ ला स्थापना झाली होती. मुख्य कार्यालय बेंगलोर मध्ये आहे. १२वी  नंतर IIST (Indian Institute of Space Science Technology) मध्ये प्रवेश घ्यावा लागतो. DRDO ही  एक देश रक्षणासाठी बनवलेली संस्था आहे ज्याची १९५८ मध्ये स्थापना झाली होती. वेपण सिस्टिम, मिलिटरी टेकनॉलॉजी विकसित करण्याची कामे इथे होतात. अग्नी, पृथ्वी, नाग, त्रिशूल, आकाश इथेच बनवले आहेत. देश मजबूत कसा बनेल हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यसमोर ठेऊन हे काम करतात. ७० हजार च्या आसपास सुरुवातीला सॅलरी मिळते त्याबरोबरच इतर सर्व भत्ते मिळतात.७. University Professor: प्रोफेसर बनण्यासाठी १०+२ बरोबरच पदवी आणि उच्च पदवी असणं गरजेचं असतं. ५५% चा क्रायटेरिया असतो. NET (National Testing योग्यता एक्साम द्यावी लागते) सुरुवातीला assistant professor म्हणून रुजू व्हावे लागते. वयाची अट २१ ते २८ अशी आहे. ३५ हजार ते ६७ हजार सॅलरी मिळते व इतर भत्ता वेगळा मिळतो. ज्या विद्यार्थ्यांना इतरांना शिकवायला किंवा आपलं स्किल दुसर्यांना सांगायला आवडतं अश्यानी नक्कीच या करिअर कडे जायला हवं. समाज्यामध्ये प्रोफेसर ला प्रतिष्ठित व्यक्तिमत्व समजले जाते. सहाय्यक प्रोफेसर, सह प्रोफेसर आणि नंतर प्रोफेसर अशी बढती मिळते.


८. Public Sector Undertaking: ज्यांना खाजगी नौकरी करण्यामध्ये जास्त रस नसतो त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये सरकारचे ५०% पर्यंत कंट्रोल असते त्यामुळे या नौकऱ्या सरकारी नौकऱ्याच असतात. या कंपन्यांमध्ये केंद्र किंवा राज्य सरकारचे नियंत्रण असते. Chartered Accountant, Doctors, engineers  आणि Lower अप्लाय करू शकतात. यामध्ये महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न असे रँक नुसार पदे असतात. Oil and Gas, Bhel, HPCL अश्या प्रकारच्या कंपनी यामध्ये आहेत. सॅलरी ६० हजार ते १.८ लाखापर्यंत मिळते.


९. Income Tax Officer: IT Officer बनण्यासाठी अगोदर IT Inspector बनाव लागतं. हा असा सरकारी जॉब आहे ज्यामध्ये युनिफॉर्म घालायची गरज नसते. सुरुवातीला डेस्क वर आणि नंतर फील्ड वर काम करण्याची संधी मिळते. यासाठी पदवी लागते आणि २० ते ३० वर्षा पर्यंत वयोमर्यादा चालते. SSC, CGL द्वारे अप्लाय करावे लागते. ५-६ वर्षानंतर IT Officer बनते. समाज्यामध्ये खूप आदर मिळतो. ५० हजार आणि इतर भत्ता अशी सॅलरी सुरुवातीला मिळते.


१०. Government Doctors: मेडिकल ऑफिसर, सिनिअर मेडिकल ऑफिसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर, सिनिअर प्रोफेसर अशी बढती मिळत जाते. MBBS  सारख्या वैद्यकीय पदव्या घेतल्यानंतर इथे प्रवेश मिळतो. पदानुसार सॅलरी वाढत जाते. सुरुवातीला ७५ हजार ते २ लाख आणि इतर भत्ता वेगळामिळतो. सर्वात जास्त डिमांड असणारा हा जॉब आहे. डॉक्टर म्हणजे समाज्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असतो ज्याला लोक देवासमान मानतात.


दिलेल्या १० नौकाऱ्यांमध्ये सॅलरी कमी-जास्त असू शकते पण इतर भत्ते म्हणजेच  घर, गाडी, मुलांचे शिक्षण, प्रवास अश्या प्रकारच्या सर्व सुविधा यामध्ये समाविष्ट असतात त्यामुळे सॅलरी अजून वाढते. सर्व सुखसोई मिळतात म्हणून सरकारी नौकरी आनंदाची आणि कमी कष्टाची समजली जाते. आपण जर सरकारी नौकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर खूप मेहनत करा म्हणजे हे नक्कीच मिळेल. आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्या.


धन्यवाद.     


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या