भारतामधील सर्वात जास्त पगार मिळणाऱ्या १० नौकऱ्या (Top 10 Highly paid jobs in India)

भारतामधील शिक्षण पद्धती बरी असली तरी काही कोर्स असे आहेत कि जे केल्यानंतर आपल्या टॅलेंट नुसार खूप जास्त सॅलरी वाले जॉब मिळतात. आता आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणार आहे त्यामुळे पुढील काळ नौकाऱ्यांसाठी अधिक चांगला असेल. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉलेज प्लेसमेंट मधून किंवा कंपनी मध्ये जाऊन जॉब मिळवू शकतो. आजकाल जॉब पोर्टल्स मोठ्या प्रमाणात आपल्या साईट वर जॉब उपलब्ध करून देतात त्यामुळे जॉब मिळवणं अजून सोपं झालं आहे. TopJobSites  या लिंक वर जाऊन टॉप ५ जॉब पोर्टल्स कोणते आहेत ते पाहू शकता. Top 10 Highly paid jobs in India

१. Chartered Accountant: हा कोर्स आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणीही करू शकतो. CA  ला अगोदर पासूनच खूप डिमांड आहे त्यामध्ये आता GST मुळे अजूनस्कोप वाढला आहे. CA हा कोर्स ICIA (Institute of Chartered Accountants of India)  ने बनवला आहे. १२वी नंतर CPT, IPCC आणि CA Final अश्या ३ level पूर्ण कराव्या लागतात.  खूप कमी लोक CA बनतात पण मेहनत घ्यायची आपली तयारी असेल तर अवघड काहीच नाही. CA हे कंपनीचे अकाउंट संबंधी सर्व कामे पाहतात त्यामुळे प्रत्येक organisation ला CA ची गरज असते. जर जॉब करायचा नसेल तर स्वतःची CA फर्मही चालू करू शकतो. CA ला ५ लाख ते ३२ लाख पॅकेज मिळु शकते.   

२. Investment Banker: यालाच money man असंही म्हणतात कारण कंपनी चे सर्व financial सल्ले देणं हा इन्व्हेस्टमेंट बँकर चा मेन जॉब असतो.  भारतामध्ये investment banker खूप कमी आहेत. सर्वात जास्त सॅलरी घेणारा हा एक जॉब आहे. यासाठी Finance मधून MBA करावं लागेल तेही टॉप च्या कॉलेज मधून आणि strong communication skills असणं खूप गरजेचं असतं. Specialist in International Business असलेल्या मुलांना हा जॉब लवकर मिळतो. ६ लाख ते २० लाखांपर्यंत पॅकेज मिळु शकतं.


३. Company Secretory: Company Secretory हा कोर्स ICSE  (Institute of Company Secretaries of India)  ने बनवला आहे. कंपनी च्या सर्व गोष्टी म्हणजेच रिपोर्ट बनवणं, सर्वांमध्ये कॉ-ऑर्डिनेशन ठेवणं अश्या प्रकारची सर्व महत्वाची कामे करावी लागतात. CS ला कंपनी चा Backbone समजलं जातं. १२वी झाल्यानंतर आपण CS ची तयारी करू शकतो. आर्टस्, कॉमर्स किंवा सायन्स मधील विद्यार्थी CS करू शकतात. Foundation, Intermediate आणि Final अश्या ३ stage मधून जावं लागत. ४ लाख ते १८ लाखांपर्यंत पॅकेज मिळु शकतं. 


४. Commercial Pilot: कमर्सियल पायलट बबनण्यासाठी Physics Chemistry आणि Math घेऊन ५०% ने १२ पास झाली पाहिजे तसेच Pilot बनण्यासाठी भारतीय  नागरिक असायला हवं. याच्यासाठी स्टुडन्ट पायलट लायसन्स, प्रायवेट पायलट लायसन्स आणि कमर्शिअल पायलट लायसन्स काढावे लागतात. पायलट बनण्यासाठी खूप जास्त खर्च येतो कारण प्रॅक्टिस करावी लागते आणि त्याचा पूर्ण खर्च स्टुडंट्सना करावा लागतो. पायलट बनल्यानंतर १५ लाख ते ३० लाखांपर्यंत पॅकेज मिळु शकते.   


५. Project Manager: IT, Telecommunication, Construction अश्या विविध क्षेत्रांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर ची गरज असते.  प्रोजेक्ट मॅनेजर हा कंपनी मधील महत्वाचा व्यक्ती असतो. पूर्ण प्रोजेक्ट मधील नवीन एम्प्लॉयी घेण्यापासून प्रोजेक्ट मेंटेनंन्स पर्यंत सर्व कामांवर लक्ष ठेवावं लागतं. एका प्रकारे learning Management System चं काम करतो. प्रोजेक्ट रिपोर्ट, परफॉर्मन्स रिपोर्ट, प्रॉडक्ट आयडिया सत्यात कशी येईल याच सर्व नियोजन मॅनेजर ला करावं लागत. सेल्स टीम बरोबर चर्चा करून मार्केट चा अंदाज घेऊन प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट मध्ये बदल करावे लागतात. मॅनेजमेंट मधील लोकांना रिपोर्ट सादर करावे लागतात. अश्या प्रकारे खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी प्रोजेक्ट मॅनेजर बघत असतो.  प्रोजेक्ट मॅनेजर बनण्यासाठी कॉम्पुटर मध्ये किंवा बिसनेस मध्ये डिग्री आणि अनुभव असणे गरजेचे आहे. प्रोजेक्ट मॅनेजर ला १५ लाख ते २५ लाखापर्यंत पॅकेज मिळु शकते. 


६. Marketing/Sales Head: हा जॉब थोडा अवघड वाटतो पण मजेदार आहे. मार्केटिंग किंवा सेल्स हेडचं सर्व गोष्टींवर कंट्रोल असतं. कंपनी आणि कस्टमर या दोघांचा विचार करून तो काम करत असतो. Internal Teams, digital Advertising , Promotions,  Social Platforms, budgets या प्रकारची सर्व कामे करावी लागतात. Marketing Sales Head कडे Analytical and Problem Solving Skills असायला हवीत. यासाठी मार्केटिंग मधील डिग्री असायला हवी. अनुभावानुसार सॅलरी वाढत जाते. ५ लाख ते १८ लाखापर्यंत पॅकेज मिळु शकते. 


७. Doctor: डॉक्टरांना देव मानलं जातं कारण डॉक्टरांमुळेच लोकांचे जीव वाचतात. सध्या चालू असणाऱ्या करोना महामारीच्या काळात डॉक्टरांचा रोल किती महत्वाचा आहे ते आपण पाहतच आलात. हे असं एक क्षेत्र आहे जिथे मंदी नसते किंवा खूप कमी असते. भारतामध्ये लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांचे प्रमाण खूप कमी आहे.  M.B.B.S, B.D.S, M.D, B.A.M.S करून आपण डॉक्टर बनू शकता पण यासाठी सायन्स मधून (Physics, Math, Biology) चं शिक्षण घेतलेलं हवं. ८ लाख ते २० लाखापर्यंत डॉक्टरांना पॅकेज मिळते. ८. Lawyer: हे एक महत्वाचं करिअर मानलं जातं. गावामध्ये जास्त बोलणारा तरुण असला कि लोक त्याला म्हणायचे तू एक चांगला वकील होशील. वकिलांना सर्व लीगल गोष्टींचा अभ्यास असतो त्यामुळे कंपनी, राजकीय लोक किंवा इतर सर्व गोष्टींसाठी वकिलांची गरज पडतेच. बरेच नेते अगोदर वकिली करतात आणि मग नेता बनतात. corporate consultant, Civil Services किंवा स्वतःची consultancy सुरु करून खूप सारे पैसे कमवू शकतो. ५०%  मार्क्स मिळवून १२ वी नंतर प्रवेश घेऊ शकता. BA  LLB किंवा BSC LLB करता येते. LLB नंतर LLM  आणि PHD हि करू शकता. १० लाख ते २० लाखापर्यंत पॅकेज मिळु शकते. 


९.  Software Developer: आजच्या काळातील गरज बनलेलं हे एक करिअर आहे. आज प्रत्येक गोष्ट कॉम्पुटर, मोबाइल द्वारे होत आहे. कॉम्पुटर मुळे व्यापाराचा वेग वाढला आहे. काहीही गरज पडली कि आपण अगोदर कॉम्पुटर कडे जातो आणि ते शोधण्याचा प्रयत्न करतो. coding, Testing, Developing अश्या प्रकारे 
एका डेव्हलपर ची कामे असू शकतात. यामध्ये Android Developer, Java Developer, Web Developer सारखे जॉब मिळतात. आपल्या knowledge आणि experience  नुसार सॅलरी मिळते.  BCA-MCA, BCS-MCS अश्या प्रकारचे कॉम्पुटर कोर्स करून Software Developer बनू शकता.  ४ लाख ते २० लाख पॅकेज मिळू शकते. 


१०. Digital Marketing: आजकाल जास्त चर्चेत असणारे क्षेत्र म्हणजे डिजिटल मार्केटिंग. इंटरनेट वापराचं प्रमाण जसं जसं वाढत जाईल तसं तसं डिजिटल मार्केटिंग चा वापर वाढत जाणार आहे. आज आपण पाहतो प्रत्येक व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. काळानुसार मार्केटिंग, advertising ची पद्धत बदलत गेली. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे डिजिटल मार्केटिंग. Amazon, Flipkart सारख्या E-commerce कंपन्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये जॉब मिळतात. डिजिटल मार्केटिंग कोर्स कोणीही करू शकतं आणि स्वतःचा व्यवसाय हि चालू करू शकता.  


वर दिलेल्या सर्व नौकऱ्या या आपल्या कौशल्यानुसार आणि मेहनतीनुसार मिळतात त्यामुळे दिलेले पॅकेज तेवढे असेलच असं नाही म्हणजे जास्तही असू शकत किंवा कमीही. आपण सामाज्यामध्ये वावरत असताना आपल्याला बरेच सॉफ्टवेर इंजिनिअर, किंवा वकील जास्त पैसे कमवताना दिसत नसतील कारण त्यांनी तशी मेहनत घेतली नसेल. जर एखाद्या गोष्टींमध्ये आपलं पॅशन असेल तर ती गोष्टी १००% यशस्वी होतेच. आपण शिक्षण घेत असताना फक्त शिक्षण घेयचं आहे हा हेतू ठेऊ नका म्हणजे आपले ध्येय ठरूवुन त्याचा पाठलाग करत राहा. तुम्ही यापेक्षा जास्त पैसे कमवू शकता. तुम्हाला आमच्यकडून शुभेच्या. 


धन्यवाद.       


   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या