१० वी नंतर या ९ सरकारी नौकऱ्यांमध्ये करू शकता आपले करिअर. (Top 9 Government Jobs After 10th)


१० वी नंतर बरेच पर्याय आहेत आर्टस्, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा इत्यादी पण ज्या लोकांना पुढे शिक्षण घ्यायचं नाही अश्या लोकांसाठी सरकारी जॉब आहेत जे आपण १० वी नंतर करू शकतो. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबासाठी लवकर पैसे कमवायची इच्छा असेल तर त्यांनी १० वी नंतरच्या खाली दिलेल्या सर्व पर्यायांबद्दल एकदा विचार करावा.


Top 9 Government Jobs After 10th

 
१. Indian Air Force: Indian Air Force मध्ये MTS (Multi Tasking Staff) पदासाठी भरती निघते ज्यामध्ये Mess Staff, cleaner, Helper यांसारखी पदे असतात. General साठी १८-३० वयोगटातील मुले online किंवा Offline फॉर्म भरू शकतात. भरती झाल्यानंतर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. English आणि Math या विषयांचा चांगला अभ्यास पाहिजे. सुरुवातीला १८०००-२०००० सॅलरी मिळते. 

२. Education Department Bank: शैक्षणिक संस्था आणि बँकेमध्ये Peon म्हणजेच शिपाई या पदासाठी नेहमी भरती चालू असते. १० वी पास झालेली मुले या पदासाठी online किंवा offline अर्ज करू शकतात. १८-२६ अशी वयोमर्यादा General साठी आहे. सुरुवातीला १८००० पर्यंत सॅलरी मिळते. 

३. MR Entry: भारतीय नौसेना दलामध्ये ज्यांना जॉब करण्याची इच्छा असते त्यांना १०वी नंतर हा उत्तम पर्याय होऊ शकतो. Chef and Steward (आचारी आणि वेटर) या पदासाठी भरती निघते. १८ ते २१ हि वयोमर्यादा आहे. सुरुवातीला २१००० हजारांपर्यंत सॅलरी मिळते. Written Physical आणि Medical असे राऊंड असतात. Chef  ला जेवण बनवण्या बरोबरच इतर कामेही करावी लागतात. 


४. CRPF (Central Reserve Police Force): Trade Man (Constable) या पदासाठी भरती असते. विशिष्ट परिस्थितीमध्ये, नक्षली भागामध्ये या ऑफिसर्स ना तैनात केले जाते. ग्रह मंत्रालयाद्वारा यांची नियुक्ती होते. General मधील १८-२३ वयोगटातील मुले आणि मुली online किंवा offline फॉर्म भरू शकतात. २२००० पर्यंत सुरुवातीला सॅलरी मिळते. 


५. Indian Post: भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक,ब्रांच पोस्ट मास्टर, assistant branch post master  अश्या प्रकारची पदे निघतात. १८-२७ वयोगटातील मुले व मुली online किंवा offline पद्धतीने फॉर्म भरू शकतात. १२००० ते २०००० हजारापर्यंत सुरुवातीला सॅलरी मिळते. 


६. Service Selection Commission (SSC): GD Soldier (General Duty) यांसारख्या पदासाठी १८ ते २३ वयोगटातील १० वी  पास असणारी मुले व मुली online किंवा offline आवेदन करू शकतात. हि सर्वात जास्त फेमस असणारी  सरकारी vacancy मानली जाते. हि पदे सेंट्रल पोलीस मध्ये मोडतात. प्रवेशासाठी मुलांना १७७ cm उंची आणि ५ किलोमीटर रनिंग करावी लागते. Border Security Force, Central Industrial Security Force, सशस्त्र सीमा दल अश्या प्रकारच्या फोर्स मध्ये समावेश होतो. २०००० ते ३०००० हजारांपर्यंत सॅलरी मिळते. 


७. Military Engineering Service (MES): प्लंबर, पेंटर, इलेकट्रिशिअन अश्या प्रकारची टेक्निकल पदे असतात. १० वी आणि ITI असेल तर तुम्हाला ४५००० आसपास सॅलरी मिळते. १८-२७ वयोमर्यादा असणारी मुले या पदांसाठी online किंवा offline फॉर्म भरू शकतात. सर्व प्रकारची सरकारी बांधकाम निगडित असणारी कामे इथे  होतात.  

८. Border Security Force (BSF): देशाची रक्षा, बॉर्डर वरील निययंत्रण अश्या प्रकारची सेवा BSF जवान पुरवतात. १८ ते २३ वयोगटातील महिला आणि पुरुष या पदासाठी फ्रॉम भरू शकतात. पुरुष उंची १७० cm आणि स्त्रियांची उंची १५७ cm असायला हवी. २०००० पर्यंत सुरुवातीला सॅलरी मिळते. 

९. Indian Reserve Police (IRB): IRB पोलीस कॉस्टेबल हि पदे राज्यांच्या नियमानुसार असतात. Indian Reserve Battalion State Military Force साठी १८ ते २५ वयोगटातील महिला आणि पुरुष online किंवा offline अर्ज करू शकतात. election Duty, low and order duty, Special Task साठी यांना  काम करावे लागते. २० ते २५ हजारांपर्यंत सुरुवातीला सॅलरी मिळते.  


याबरोबरच अनेक प्रकारच्या छोट्या-मोठ्या पदांसाठी सरकारी नौकऱ्या आहेत ज्या १० वी नंतर मुले करू शकतात. या पदांसाठी इंग्लिश आणि कॉम्पुटर ची माहिती असणे गरजेचे असते जेणेकरून पुढे  जाऊन काही प्रॉब्लेम्स  येत नाहीत. दिलेली वयोमर्यादा General Category साठी आहे त्यामुळे OBC, SC/ST साठी वाढीव वयोमर्यादा असते. सरकारी वेबसाईट वर जाऊन वेळोवेळी निघणाऱ्या फॉर्म ची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा द्याव्यात आणि सरकारी नौकरी मिळ्वण्यासाठजी प्रयत्न करावेत. १० वी  नंतर जर पुढे शिकायचे असेल तर https://www.babaranjit.in/2020/08/what-to-do-after-10th.html या लिंक वर जाऊन १० वी नंतर असणाऱ्या सर्व पर्यायांची माहिती घ्यावी.  आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्यकडून खूप खूप शुबभेच्या. 

धन्यवाद.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या