५+३+३+४ नवीन शिक्षण पद्धती नेमकी कशी असेल? (What is New Education Policy 5+3+3+4?)


 भारतीय शिक्षण पद्धतीवर नेहमी सर्वच स्तरातून चर्चा होत असते. आपली शिक्षण पद्धती जॉब ओरिएंटेड नाही किंवा विकसित देशांमध्ये जी शिक्षणपद्धती आहे तशी नाही त्यामुळे म्हणावा तसा विकास होत नाही. देशाचा विकास युवा वर्गावर अवलंबून असतो आणि युवा वर्ग शिक्षण पद्धतीवर. वर्षानुवर्षे तीच शिक्षण पद्धती चालत आली आहे परंतु ३४ वर्षानंतर आता यामध्ये बदल होणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बनवलेल्या या शिक्षण धोरणाला कॅबिनेट ने मंजुरी दिली आहे. हे बिल आता संसदेमध्ये जाईल आणि नंतर विविध राज्यांमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतले जातील. २ लाख लोकांचा सल्ला घेऊन हे धोरण बनवले आहे. २०२१ पासून या धोरणाला सुरुवात होऊ शकते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथून पुढे शिक्षणावर जास्त खर्च केला जाणार आहे. ३% वरून GDP ६% होणार आहे.१०+२ ऐवजी आता ५+३+३+४ अशी शिक्षण पद्धत असणार आहे. सध्या आपली १०वी झाल्यानंतर आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या इंटरेस्ट नुसार आणि गुणांनुसार आपण याची निवड करायचो. परंतु आपण सायन्स घेतलं तर आपल्याला आर्ट्समधील विषय शिकता येत नाहीत म्हणजेच समजा आपण सायन्स घेतलं आणि आपल्याला अकाउंटिंग शिकायची इच्छा असेल तर असं करता येत नव्हतं. किंवा आर्ट्स घेतलं तर भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र शिकता येत नव्हतं. पण आता ते शक्य होणार आहे. विज्ञान शिकणारी मुलं इतिहास शिकू शकतात किंवा कॉमर्स शिकणारी मुले physics शिकू शकतात.

काय आहे ५+३+३+४ हा फॉर्मुला ते आपण समजावून घेऊया. 


फॉर्मुला ५: ३ ते ६ वयोगटातील मुले यामध्ये येतील. म्हणजेच अंगणवाडी ते दुसरी मधील मुले या गटात मोडतील. Nursery, LKG, UKG हे ३ वर्ष आणि १st  आणि २nd हे २ वर्ष. यामध्ये ऍक्टिव्हिटी वरती जास्त भर दिला जाईल, भलं मोठ दप्तराचं ओझं शाळेमध्ये घेऊन जायची गरज नसणार आहे. इथे मुलांचा पाया पक्का केला जाईल. सर्वांना लिहता वाचता आलं पाहिजे हा यामागचा हेतू असेल. 

फॉर्मुला ३: यामध्ये तिसरी (३rd), चौथी (४th)  आणि पाचवी (५th) चा समावेश असेल. यामध्ये विज्ञान, गणित, कला अश्या विषयांवर जास्त भर दिला जाईल. तसेच प्रादेशिक किंवा राष्ट्रीय भाषेमध्ये शिक्षण घेण्यावर सुद्धा भर दिला जाईल यामध्ये सर्व महत्वाच्या विषयाची ओळख  करून दिली जाईल.

फॉर्मुला ३: हे ३ वर्ष ६वी ते ८वी साठी असतील. हे ३ वर्ष खूप महत्वाचे असणार आहेत. यामध्ये आपल्या आवडीनुसार म्हणजेच कोडींग, पेंटिंग किंवा मोबाईल अँप्लिकेशन बनवणे अश्या विषयांचा अभ्यास करू शकता. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलागुणांना जास्त वाव दिला जाईल. यामध्ये आपण शिक्षण घेत असताना इंटर्नशिप करू शकता म्हणजेच जर आपल्याला कोडींग मध्ये इंटरेस्ट असेल तर एखाद्या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये २-३ तासांसाठी जाऊन शिकू शकता.  पैंटिंग ची आवड असेल तर एखाद्या पेंटर कडे जाऊन पैंटिंग शिकू शकता.  

फॉर्मुला ४: ९वी ते १२वी असे ४ वर्ष यामध्ये येतील. हि ४ वर्ष खूप महत्वाची असणार आहेत. इथेच आपल्या करिअर ची सुरवात होणार आहे. आर्टस्, कॉमर्स किंवा सायन्स असा भेदभाव नसणार आहे. आपण आपल्या आवडीनुसार विषयाची निवड करू शकता. प्रत्येक ६ महिन्याला म्हणजेच सेमिस्टर वाईस परीक्षा असणार आहे त्यामुळे मुले सतत अभ्यासावर लक्ष देतील. मुले आपल्याला पुढे जाऊन काय बनायचं आहे ते इथेच फायनल करतील.

१२वी नंतर: हा ४ वर्षांचा कोर्स असेल. यासाठी CAT (कॉमन एंट्रन्स टेस्ट) द्वारे प्रवेश मिळू शकतो. पहिलं एक वर्ष पूर्ण केलं कि सर्टिफिकेट मिळणार आहे, दुसरे वर्ष पूर्ण केलं कि डिप्लोमा मिळणार आहे. ३ वर्ष पूर्ण केली कि डिग्री मिळणार आहे. आणि ४ वर्ष पूर्ण केल्यानंतर रिसर्च सर्टिफिकेट मिळणार आहे. समजा काही कारणाने १ किंवा २ वर्ष पूर्ण करून शिक्षण सोडलं आणि नंतर काही वर्षाने प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही त्या वर्षपासून पुढे शिक्षण घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक वर्षाचं वेगळं रेकॉर्ड राहणार आहे. मल्टि एन्ट्री आणि मल्टि एक्सिट प्रकारचे शिक्षण असणार आहे.  

या शिक्षणामध्ये सुरुवातीपासून शालेय बरोबरच इतर गोष्टींचं जे शिक्षण घेतलं आहे किंवा इंटर्नशिप केली आहे ते सर्व रेकॉर्ड गव्हर्मेंट एका ठिकाणी ठेवणार आहे. म्हणजेच सर्व गोष्टी डिजिटली स्टोर करून ठेवल्या जाणार आहेत. या धोरणामुळे संगीत, साहित्य कला यांचा विकास होणार आहे. १०वी १२वी बोर्डाच्या परीक्षांचे महत्व कमी होणार आहे. शिक्षकांबरोर विद्यार्थी आणि त्यांचे मित्र यांचाही शेरा रिपोर्ट कार्ड वरती असणार आहे.

या सर्व गोष्टींसाठी थोडा वेळ नक्कीच लागेल. याच्यामध्ये पुढे जाऊन थोडेफार बदल होऊ शकतात. ऑनलाईन शिक्षणावर जास्त भर दिला जाईल.

धन्यवाद. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

If you have any doubts please let me know