१० वी नंतरचे पर्याय (What to Do After 10th)

नुकतेच १०वी चे निकाल लागले आहेत त्यामुळे १०वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं हा एकमेव प्रश्न पडला असेल. त्यात आसपासच्या लोकांची विचारपूस चालू झालेली असेल. अरे तू १० वी पास झालास ना? मग सायन्स ला प्रवेश घेणार असशील? अरे खूपच कमी गुण मिळाले जाऊदे पास तर झालास ना? आर्ट्स ला प्रवेश घे. तुला चांगले गुण मिळाले कॉमर्स कर म्हणजे बँकेत वगैरे लागून जाशील. असे शब्द ऐकलेच असतील तुम्ही असो, मग काही ठरवलं का नाही अजून का घरचे जे बोलतात तेच करायचं?निकाल लागेपर्यंत किती गुण मिळतात याचं टेन्शन आणि आता हा गोंधळ कारण १०वी पर्यंत सर्वाना सारखेच विषय असतात त्यामुळे काही टेन्शन नसत. आता सरकारच्या नियमानुसार नवीन पद्धतीमध्ये म्हणजेच ५+३+३+४ मध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडण्याची मुभा असणार आहे त्या विषयाबद्दल मी नंतर लिहणारच आहे. १२वी नंतर आपल्याला कशामध्ये करिअर करायचं आहे त्याची निवड आत्ताच करावी लागते. म्हणजेच आपल्याला डॉक्टर बनायचे असेल तर Biology तर इकॉनॉमिस्ट बनायचे असेल तर Math घेणं गरजेचं आहे. 

१० वी नंतरच्या मुख्य ३ शाखा आहेत 

१. आर्ट्स: खूप साऱ्या लोकांचा गैरसमज असतो कि कमी गुण मिळाले तर आर्ट्स ला जायचं कारण तिथे जास्त मोठं होता येत नाही. परंतु आर्ट्स शिकणारी मुले पुढे जाऊन नेता, वकील, शिक्षक, समाजसेवक, कलाकार प्रशासकीय सेवक बनतात. आर्ट्स मध्ये इतिहास (History), इंग्लिश (English), भूगोल (Geography), मानसशास्त्र (Psychology), राज्यशास्त्र (Political Science) अर्थशास्त्र (Economics), भाषा (हिंदी/संस्कृत), समाजशास्त्र (Sociology), तत्वज्ञान (Philosophy) पुरातत्त्वशास्त्र (Archaeology) यासारखे विषय शिकवले जातात. 

२. कॉमर्स: वाणिज्य मध्ये प्रवेश घेतल्यानंतर अकाउंटिंग सारख्या विषयांचा अभ्यास केला जातो. चार्टर्ड अकॉउंटंट (CA) , कंपनी सेक्रेटरी (CS) कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट (CSWA ) साठी कॉमर्स ला प्रवेश घेणं गरजेचं असतं त्याच्याबरोबरच बँक, अकाउंटंट किंवा विमा क्षेत्रामध्ये जॉब करू शकता. ज्यांना व्यवसायामध्ये रस असेल त्यांनी नक्कीच कॉमर्स घ्यावं. वाणिज्य मध्ये पर्यावरण शिक्षण (Environment Education), इंग्लिश, शारीरिक शिक्षण (Health and Physical Education), Information Technology, गणित आणि आकडेवारी (Mathematics and Statistic), Secretarial Practice, अर्थशास्त्र (Economics), Book Keeping and Accountancy), वाणिज्य आणि व्यवस्थापन संस्था (Organization of Commerce and Management), Modern Indian or Foreign Languages (any One) हे विषय असतात. 
 
३. सायन्स: ९०% पालकांची इच्छा असते की आपला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनिअर झाला पाहिजे पण मुलाला अशामध्ये इंटरेस्ट आहे का ते पाहणे खूप महत्वाचं असत. सायन्स मध्ये खूप संधी आहेत. कॉम्पुटर, मेडिकल, गणित, गव्हर्मेंट अश्या बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपलं नशीब आजमावू शकतो. यामध्ये भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (biology), गणित (Math), Computer Science, इंग्लिश, असे महत्वाचे विषय असतात. 

या प्रमुख ३ शिवाय ज्यांना ११वी १२वी करायची नाही अश्यांसाठी डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. 

१. (Industrial Training Institute) ITI: नेमकं ट्रैनिंग आणि लवकर विध्यार्थ्यांना जॉब मिळण्यासाठी याची निर्मिती झाली. डिग्री न करता हे कोर्स उपलबद्ध करून दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने Tool and Die Maker Engineering (३ वर्ष), Mechanical Engineering (२ वर्ष), Diesel Mechanic Engineering (१ वर्ष), Fitter Engineering (२ वर्ष) Pump Operator (१ वर्ष) etc. कोर्स आहेत. 

Polytechnic: यामध्ये खूप सारे डिप्लोमा कोर्सस आहेत  आपल्या इंटरेस्ट नुसार कोर्स निवडून प्रवेश घेऊ शकता. यामध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेज आहेत. Entrance Exam नंतर आपल्याला प्रवेश मिळतो. काही डिप्लोमा कोर्सस खालील प्रमाणे.   

१. Diploma in Electrical Engineering: ज्यांना इलेक्ट्रिकल मध्ये इंटरेस्ट आहे आणि technical गोष्टींमध्ये रस आहे तर या डिप्लोमा कोर्स ला जाऊ शकता. 

२. Diploma in Mechanical Engineering: ज्यांना मेकॅनिकल मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी हा ३ वर्षाचा कोर्स आहे.   

३. Diploma in Civil Engineering: १० वी नंतर चा हा polytechnic diploma कोर्स आहे. हा ३ वर्षाचा कोर्स आहे. 

४. Diploma in Electronics Engineering: हा ३ वर्षाचा कोर्स आहे. १० वि मध्ये ५०% मार्क्स हवेत. 

५. Diploma in Chemical Engineering: chemical engineering मध्ये रिसर्च केले जातात. entrance Exam दिल्यानंतर डिप्लोमा ला ऍडमिशन मिळते. हा ३ वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे.  

६. Diploma in Textile Technology: हा कपडे, फायबर यांच्या मशिनरी रिलेटेड कोर्स आहे. हा डिप्लोमा केल्यानंतर कपडा इंडस्ट्री मध्ये आपण करियर बनवू शकतो. हा ३ वर्षाचा कोर्स आहे. 

७. Diploma in Computer Engineering (Hardware): हा ३ वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये कॉम्पुटर हार्डवेर मध्ये आपण आपलं करिअर करू शकतो आणि हार्डवेर इंजिनिअर बनू शकता.  

८. Diploma in Automobile Engineering: ज्यांचं शिक्षणामध्ये लक्ष लागत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट कोर्स असेल कारण आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जास्त स्कोप आहे. आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. हा ३ वर्षाचा कोर्स आहे. 

९. Diploma in Dental Mechanics: हा २ वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये डेंटल क्षेत्रामध्ये आपलं कॅरिअर करू शकतो.

१०. Diploma in Hotel Management: हॉटेल क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल तर हा कोर्स नक्की करायला हवा. २ वर्षाचा हा कोर्स असेल. देश विदेशामध्ये आपल्याला जॉब मिळेल किंवा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. 

११. Diploma in Beauty Culture: महिलांसाठी हा कोर्स मानला जातो पण यामध्ये पुरुषही आहेत. हा कोर्स फक्त ४ महिन्याचा आहे. कमी वेळेमध्ये आपलं करिअर बनवण्याचा योग्य पर्याय. 

१२. Diploma in Fashion Technology:  आजच्या काळामध्ये फॅशन इंडस्ट्री ला खुप स्कोप आहे. ३ वर्षाचा हा कोर्स करून आपण करिअर बनवु शकतो. 


  


         


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

If you have any doubts please let me know