Useful Shortcut Keys for your Computer/Laptop in marathi

आजच्या २१ व्या शतकामध्ये आपला कॉम्पुटर आणि लॅपटॉप हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्याकडे कम्पुटर किंवा लॅपटॉप नसेल तरीही कुठेतरी त्याच्याशी आपला संबधं येतोच त्यामुळे या Shortcut keys बद्दल तुम्हाला माहिती असावी. आपण जर कम्प्युटर चे विद्यार्थी किंवा शिक्षक असाल तर मग तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होईल. या डिजिटल दुनियेमध्ये कम्पुटर खूप मोठा रोल निभावत असतो. त्यामुळे खाली दिलेल्या सर्व Shortcut keys चा वापर करा आणि आपला वेळ वाचवा. आजच्या तरुणाने स्मार्ट पद्धतींचा सर्व गोष्टींचा वापर करायलाच हवा नाहीतर या कॉम्पिटेशनच्या काळात आपण खूप मागे राहू. घरी बसून काहीही गुंतवणूक न करता तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर Jobs वर क्लिक करा आणि पूर्ण माहिती घ्या.Function Keys 

१. F१ or Function Key + F१: जर आपण कम्प्युटर वापरत असाल तर Help Center ओपन करण्यासाठी F१ चा वापर करा. आणि लॅपटॉपचा वापर करत असाल तर Function Key + F१ चा वापर करा. या शॉर्टकट की द्वारे आपण सर्व प्रकारची सॉफ्टवेअर, अप्लिकेशन किंवा कॉम्पुटर रिलेटेड माहिती पाहू शकतो.

२. F२: ही शॉर्टकट की Folder किंवा Documents च्या नावात बदल म्हणजेच Rename करण्यासाठी होतो.

३. F३: ही शॉर्टकट की Internet Browser मध्ये text सर्च करण्यासाठी तसेच Windows Option मध्ये Applications किंवा कोणत्याही प्रकारची फाईल सर्च करण्यासाठी होतो.

४. F५: ही key कॉम्पुटर रिफ्रेश करण्यासाठी किंवा browser मधील website reload करण्यासाठी होतो.

५. F७: Microsoft Office Word मध्ये Spelling किंवा Crammer चेक करण्यासाठी या शॉर्टकट की चा उपयोग होतो.Microsoft Office

१. F१२/Ctrl + S: Word, PowerPoint आणि  Excel मध्ये file Save करण्यासाठी या दोन्ही key चा वापर होतो. 

२. Ctrl + N: आपण एखाद्या File वर काम करत असताना जर आपल्याला एखादी नवीन blank  फाईल उघडायची असेल तर या key चा वापर होतो.

३. Ctrl + D: या शॉर्टकट key चा वापर करून आपण font ची window ओपन करून त्यामध्ये SIze, Style, Font यामध्ये बदल करू शकतो.

४. Ctrl + Z: Undo म्हणजेच डिलीट झालेले टेक्स्ट परत मिळवण्यासाठी या शॉर्टकट key चा वापर होतो.

५. Ctrl + A: टाईप केलेला सर्व data किंवा text  select करण्यासाठी या key चा वापर होतो.

६. Ctrl +C: Select केलेला data किंवा text कॉपी करण्यासाठी या शॉर्टकट key चा वापर केला जातो.

७. Ctrl + V: Copy केलेला data किंवा text दुसऱ्या ठिकाणी paste करण्यासाठी या शोर्कत की चा आपण वापर करू शकतो.

८. Ctrl + K: आपल्या टेक्स्ट मध्ये एखादी Hyperlink add करायची असेल तर या शॉर्टकट key चा वापर होतो. 

९. Ctrl + F: आपण लिहलेल्या text मधील काही text शोधायचं असेल किंवा Replace करायचं असेल तर या शॉर्टकट key चा वापर होतो. 

१०. Ctrl  + P: जर आपणास document प्रिंट करायचं असेल तर या शोर्कत key चा वापर करून आपण print देऊ शकतो. Other Shortcut Keys    

१. Alt +Tab: Program Switch करण्यासाठी या key चा वापर होतो. समजा आपण एकाच वेळेस video, Browser , Word Document ओपन केले असेल आणि आपला Browser चालू ठेऊन video मध्ये जायचं असेल तर minimize न करता आपण Alt +Tab दाबून जाऊ शकता. 

२. Alt + F४: एखादा चालू असलेला प्रोग्राफम किंवा file बंद करायची असेल तर या शॉर्टकट key चा वापर करू शकता. 

३. Alt + F४ + Enter: आपला कम्प्युटर बंद म्हणजेच Turn Off/Shut Down करण्यासाठी हि key वापरू शकता. 

४. Windows + D: ओपन असलेली सर्व functions किंवा windows minimize न करता आपल्याला डायरेक्ट डेस्कटॉप वर जायचं असेल तर Windows + D या key चा वापर करा. 


५. Ctrl  + T: आपल्या Browser मध्ये नवीन tab ओपन करायचा असेल तर या शॉर्टकट key चा वापर केला जातो. 

६. Ctrl +H: आपण वापर केलेल्या इंटरनेट ची पूर्ण माहिती म्हणजेच History पाहायची असेल तर आपण याचा वापर करू शकता. 

७. Ctrl +Shift +Delete: आपल्याला जर आपली पूर्ण History कायमची delete करायची असेल तर  Ctrl +Shift +Delete चा वापर करा. 

८. Ctrl +D: जर आपल्याला एखादी website save करून ठेवायची आहे जेणेकरून ती आपण पुन्हा ओपन करू शकतो अश्या वेळी आपण bookmark हा option निवडू शकता. त्याच्यासाठी Ctrl +D हि शॉर्टकट key चा वापर करा. 

९. Ctrl +Shift + T: समजा आपल्या Browser वेगवेगळे tab ओपन आहेत आणि आपल्या चुकीमुळे एखादा महत्वाचा tab बंद झाला तर या key चा वापर करून तो आपण पुन्हा ओपन करू शकता. 

१०. Ctrl + Alt + Delete: जेव्हा आपण आपल्या कॉम्पुटर वर सतत काम करत असतो त्यामुळे जास्त लोड येऊन एखाद application काम करत नाही म्हणजेच hang होतं त्यावेळेस आपण  task manager मध्ये जाऊन त्याला ठीक करू शकतो. 


याच्या व्यतिरिक्त अनेक शॉर्टकट keys आहेत ज्या आपण आपल्या कॅम्पुटर वापरताना use करू शकतो आणि आपलं काम अगदी स्मार्ट पद्धतीने करू शकतो. जी मुलं back office सारखे जॉब करत असतात अश्या लोकांसाठी सर्व शॉर्टकट keys खूप उपयोगी पडतात. नेहमी यांचा सर्व ठिकाणी वापर करा म्हणजे आपल्याला एवढी सवय होईल कि काही दिवसानंतर त्या आपोआप वापरात येतील. 

धन्यवाद. 

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या